News : कन्नड चित्रपटातील कलाकार पुनीत राजकुमार (वय ४६) यांनी श्वसनक्रिया बंद ( हार्ट अंटक) पडल्याने चित्रपटश्रुष्टी व आपल्या चाहत्यांचा निरोप घेतला. गेल्या शुक्रवारी सकाळी व्यायाम केंद्रात सराव करत असताना त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा एक मोठा बिघाड जालेला जाणवला. त्यानंतर त्यांना बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांकडून कळवण्यात आले कि त्यांची प्राणज्योत मावळी आहे. परंतु पुनीत राजकुमार यांनी जाता जाता हि सत्कर्म करून गेले त्यांच्या कार्यामुळे जवळ जवळ ४ व्यक्तींना त्यांच्या नेत्रदानामुळे नेत्रदृष्टी मिळाली. त्यांच्या निधनानंतर हि त्याचे मदतीचे हात थांबले नाही. त्यांच्या घरच्यांनी त्यांचे डोळे दान करायचे ठरवले. सहा तासाच्या कालावधीत हि प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यांच्या या निर्णयामुळे १ महिला आणि ३ पुरुष वर्गास डोळे मिळाले आहे.
हे पेशंट गेल्या ६ महिन्या पासून डोळ्यांच्या प्रेतीक्षेत वेटिंगवर होते. या पेशंटचे वय साधारण पंचवीस ते तीस असल्याचे समजते. हि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी आनंदाची बातमी होती. मरणोत्तर नेत्रदानाचा प्रेरणा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतली होती.
पुनीत कुमारयांनी याआधी सुधा सामाजिक कार्यात खूप हातभार लावला आहे. त्यांना चित्रपटा सोबतचं समाज कार्याची आवड हि पहिल्या पासूनच होती. त्यांच्या हातून आता परियंत अफाट अस समाज कार्य घडलं आहे.
पुनीत राजकुमार यांच्या समाजकार्याचा एक आढावा.
१८०० मुलांचे फ्री शिक्षण
४५ फ्री शाळा
१९ गोशाला
१६ वृद्धाश्रम
२६ अनाथ आश्रम
तसेच म्हैसूरमध्ये शक्ती धाम नावाचे मुलीसाठी शिक्षण ववस्था सुरु केल्या. तसेच प्रेक्षकान मध्ये जागृती व्यावी म्हणून त्यांनी मोफत काही चित्रीकरण हि केले .
परंतु या दरम्यान आपला लोकप्रिय कलाकार आपल्याला सोडून गेल्याने कन्नड चित्रपट जगतात मोठी शोककळा पसरली . पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी येताच त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धका बसला . त्यातच आपला लाडका अभिनेता आपल्याला सोडून गेल्याच्या धाक्यामध्ये काहीनी आत्महत्या केल्या तर काहींना हार्ट अटक आला. या मुळे काहीच मृतु हि झाला.
Read More :